देशातील पहिल्या  तीन 'एआय सेंटर ऑफ एक्सलन्स' चे उद्घाटन  

'मेक एआय इन इंडिया आणि एआय वर्क फॉर इंडिया' या व्हिजन अंतर्गत, या केंद्रांच्या स्थापनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 अंतर्गत करण्यात आली होती. या अनुषंगाने, केंद्र सरकारने एकूण 990 कोटी रुपयांच्या आर्थिक गुंतवणुकिसह  'तीन AI CoEs' तयार करण्यास मान्यता दिली आहे.

देशातील पहिल्या  तीन 'एआय सेंटर ऑफ एक्सलन्स' चे उद्घाटन  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी आज देशातील पहिल्या तीन AI सेंटर्स ऑफ एक्सलन्सचा शुभारंभ केला. (India's first three AI Centers of Excellence launched). आरोग्यसेवा (Healthcare), कृषी (agriculture) आणि सस्टेनेबल शहरांमध्ये (Sustainable city) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तीन क्षेत्रांमध्ये AI केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

IIT दिल्ली आणि AIIMS दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील 'हेल्थकेअर ऑन AI' वरील सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्दिष्ट लवकरात लवकर रोगाचे  निदान, महामारीचा मागोवा, आयुष औषधांसह आरोग्यसेवेसाठी चाचण्या आणि डेटा संकलन आदींसाठी मदत करेल. 

IIT रोपरच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या 'AI कृषी केंद्राचे' उद्दिष्ट पीक उत्पादन, हवामान आणि स्थानिक परिस्थितींवरील डेटा वापरून शेती पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून आणणे. पारंपारिक ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक अंतर्दृष्टीसह एकत्रित करून, ते पेरणी, कापणी आणि पीक आरोग्यावर एआय-सक्षम मार्गदर्शन करेल.

IIT कानपूरच्या नेतृत्वाखाली 'सस्टेनेबल' शहरांसाठी तयार करण्यात आलेले AI केंद्र, स्मार्ट सिटी नियोजन, वाहतूक व्यवस्थापन आणि कार्यक्षम संसाधन वितरणासाठी मदत करेल. सेन्सर्स, GIS नकाशे आणि सॅटेलाइट फीडमधील डेटा एकत्रित करून, ते संसाधनांच्या गरजांचा अंदाज लावेल आणि सार्वजनिक जागेच्या डिझाइनमध्ये सुधारणा करेल.

देशातील उच्च शिक्षण संस्थांचे कौतुक करताना प्रधान म्हणाले की, "तीन केंद्रे एक नवीन प्रकारची स्टार्टअप इकोसिस्टम तयार करतील जी सामान्य तरुणांना अब्जाधीश होण्याचे स्वप्न पाहण्यास प्रेरित करेल."
दरम्यान, 'मेक एआय इन इंडिया आणि एआय वर्क फॉर इंडिया' या व्हिजन अंतर्गत, या केंद्रांच्या स्थापनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 अंतर्गत करण्यात आली होती. या अनुषंगाने, केंद्र सरकारने एकूण 990 कोटी रुपयांच्या आर्थिक गुंतवणुकिसह  'तीन AI CoEs' तयार करण्यास मान्यता दिली आहे.