CMA इंटर आणि फायनलचे निकाल जाहीर

इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार  डिसेंबरमध्ये झालेल्या इंटरमीडिएट परीक्षेच्या ग्रुप १ मध्ये फक्त ४,२७५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.  तर गट २ मध्ये  ३,८३९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही गटांमध्ये एकूण १७.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

CMA इंटर आणि फायनलचे निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (Institute of Cost Accountants of India) ICMAI सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाऊंट (Certified Management Accountant) CMA इंटर आणि फायनलचे निकाल जाहीर केले आहेत. (Inter and final results have been announced) ICMA ने डिसेंबर २०२४ सत्राचा निकाल अधिकृत वेबसाइटवर icmai.in जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल तपासू शकतात. 

इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार डिसेंबरमध्ये झालेल्या इंटरमीडिएट परीक्षेच्या ग्रुप १ मध्ये फक्त ४ हजार २७५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. तर गट २ मध्ये  ३,८३९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही गटांमध्ये एकूण १७.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अंतिम परीक्षेत दोन्ही गटांसह एकूण ८१९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.  या गटाचा उत्तीर्णतेचा टक्का २२.४६ आहे. 

डिसेंबर २०२४ चा CMA निकाल कसा तपासायचा 

* सर्वप्रथम, उमेदवारांनी  ICMAI ची अधिकृत वेबसाइट icmai.in ला भेट द्यावी. 
* होमपेजवर उपलब्ध असलेल्या "स्टुडंट्स" टॅबवर क्लिक करा.
* येथे, 'स्टुडंट्स कनेक्ट पोर्टल' वर जा आणि 'परीक्षा' टॅब निवडा. 
 * आता, CMA डिसेंबर २०२४ निकाल लिंकवर क्लिक करा.
* येथे, लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा. 
* आता तुमचा स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि सेव्ह करा.