कंत्राटी शिक्षक भरतीची मोठी अपडेट, शासन निर्णय प्रसिद्ध 

ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल. तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नसल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कंत्राटी शिक्षक भरतीची मोठी अपडेट, शासन निर्णय प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डीएड, बीएड पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडून डि.एड./ बी.एड. पात्रताधारक (DEd and BEd qualification holders)उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिक्षक भरती (Contract teacher recruitment) करण्यात आली. मात्र, या शिक्षक भरती संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे (Expiration of term of appointment) अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल. तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नसल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध (Government decision published) करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या कंत्राटी शिक्षकांच्या आशा मावळल्या आहेत. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी.एड./ बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. मात्र, नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्या अनुषंगाने ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. सन २०२२ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारी २०२५ पासून प्रत्यक्षात सुरू झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन हा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे. 

राज्य शासनाने मागील काही दिवसात सदर रिक्त पदावर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना शिकवण्यासाठी आवेदन पत्र मागवले होते. मात्र, ही बाब उचित नसल्याने बारावीनंतर डीएड आणि बीएड व पदव्युत्तर शिक्षण घेऊन अनेक बेरोजगार युवक, युवती बेरोजगार आहेत. त्यामुळे रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश बदलवून जिल्ह्यातील डीएड, बीएड, पदव्युत्तर सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींची प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत कंत्राटी शिक्षक या पदावर नियुक्ती देण्याचा शान निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता.