CBSE 10 वी, 12 वी  चा निकाल दोन भागात होणार जाहीर ? बोर्डाकडून खुलासा  

या वर्षी ४४  लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई परीक्षेत भाग घेतला होता, त्यामुळे एकाच वेळी वेबसाइटवर जास्त लोड येऊ शकतो. हे टाळण्यासाठी  बोर्डाने निकाल दोन भागात जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल तपासणे सोपे होईल आणि सीबीएसईला ते अपलोड करणे देखील सोपे होईल. या नवीन प्रक्रियेमुळे निकाल थोडे उशिरा जाहीर होऊ शकतात,' असा दावा देखील या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

CBSE 10 वी, 12 वी  चा निकाल दोन भागात होणार जाहीर ? बोर्डाकडून खुलासा  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालांबाबत महत्वपूर्ण बदल करत हे निकाल दोन भागांमध्ये जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे, (Class 10th and Class 12th result will be declare in two parts) अशी माहिती देणारी पोस्ट प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पोस्ट विषयी खुलासा करत बोर्डाने ही माहिती खोटी असल्याचा खुलासा केला आहे. (fake news)

बनावट नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, 'सीबीएसईने डिजीलॉकर अॅक्सेस कोडशी संबंधित नोटीसद्वारे ही नवीन योजना लागू करण्याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, बोर्ड यावर्षी "नवीन प्रणाली" आणि "बदललेल्या पद्धती" सह निकाल जाहीर करेल. बोर्ड यावर्षी 10 वी च्या अर्ध्या विद्यार्थ्यांचा निकाल  ९ मे रोजी आणि उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल  १५ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करेल. तर १२वी चा  निकाल पहिल्या गटासाठी १४ मे रोजी सकाळी ११ वाजता आणि उर्वरित गटासाठी १६ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाईल. 

 'या वर्षी ४४  लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई परीक्षेत भाग घेतला होता, त्यामुळे एकाच वेळी वेबसाइटवर जास्त लोड येऊ शकतो. हे टाळण्यासाठी  बोर्डाने निकाल दोन भागात जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल तपासणे सोपे होईल आणि सीबीएसईला ते अपलोड करणे देखील सोपे होईल. या नवीन प्रक्रियेमुळे निकाल थोडे उशिरा जाहीर होऊ शकतात,' असा दावा देखील या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

यासंदर्भात स्पष्टीकरण देताना बोर्डाने म्हटले आहे की, ' सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट खोटी आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अशा खोट्या महितीपासून सतर्क राहावे.'