एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एकीकडे केंद्र सरकार NEP अंतर्गत सरकारी शाळांच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत करत आहे, तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखल्या जाणार्या उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) धक्कादायक बाब समोर आली आहे. या राज्यातील २७ हजारांहून अधिक प्राथमिक शाळा लवकरच बंद होण्याची शक्यता आहे (More than 27,000 primary schools are likely to close soon). त्यासाठी शिक्षण विभागाने तयारी देखील सुरू केली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या ५० पेक्षा कमी आहे अशा शाळांचा यामध्ये समावेश आहे. (This includes schools with a student population of less than 50) .
मीडिया रिपोर्ट नुसार ज्या शाळांची पटसंख्या 50 किंवा त्यापेक्षा कमी आहे,अशा शाळा जवळच्या इतर शाळांमध्ये विलीन केल्या जातील.राज्यात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला. शिक्षण विभागाकडून या संदर्भात सर्व प्राथमिक शाळांना निर्देश देण्यात आले आहेत.
कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याची तयारी शिक्षण विभागाकडून अनेक दिवसांपासून सुरू आहे. शालेय शिक्षण विभागाच्या महासंचालक कांचन वर्मा यांनी जूनमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील 50 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचा तपशील U-DISE पोर्टलवरून गोळा केला होता. राज्यात अशा शाळांची संख्या 27,931 होती. त्यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण विभागाला हे तपशील पाठवून याबाबत शाळांकडून खुलासा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वर्मा यांनी 23 ऑक्टोबर रोजी शिक्षण विभागाची आढावा बैठकही घेतली होती. त्यात त्यांनी सूचना दिल्या आहेत की ,'शाळांना पूर्णपणे व्यावहारिक बनवण्याच्या दिशेने सरकारने हे पाऊल उचलले आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा जवळच्या शाळांमध्ये विलीन केल्या जातील.'