Eduvarta exclusive:विद्यापीठ बोगस डिग्री रॅकेट? डिग्री सोबत तीनही वर्षांच्या गुणपत्रिका बोगस 

वैभव सुभाष जाधव या विद्यार्थ्यांचे केवळ डिग्री सर्टिफिकेट बोगस नाही तर त्याची प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांची गुणपत्रिका सुध्दा बोगस आहे.वैभव जाधव यांच्या डिग्री प्रमाणपत्रावर विद्यापीठाशी संलग्न दौंड तालुक्यातील के जी काटारिया कॉलेजचा उल्लेख आहे.

Eduvarta exclusive:विद्यापीठ बोगस डिग्री रॅकेट? डिग्री सोबत तीनही वर्षांच्या गुणपत्रिका बोगस 
Savitribai Phule Pune University bogus degree News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Pune University bogus degree : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)एका विद्यार्थ्यांची बनावट डिग्री पकडल्याचे वृत्त सर्व प्रथम एज्युवार्ताने प्रसिद्ध केले.आता या घटनेची अधिक माहिती समोर आली असून संबंधित विद्यार्थ्यांची केवळ डिग्री बोगस (bogus degree) नसून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांची गुणपत्रिकाही बोगस (Mark sheet bogus)असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या बोगस गुणपत्रिका व बोगस डिग्री सर्टिफिकेट तयार करणारे रॅकेट (Racket creating bogus degrees) कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी बनावट डिग्री प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.त्यानंतर रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.वैभव सुभाष जाधव या विद्यार्थ्यांचे केवळ डिग्री सर्टिफिकेट बोगस नाही तर त्याची प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांची गुणपत्रिका सुध्दा बोगस आहे.वैभव जाधव यांच्या डिग्री प्रमाणपत्रावर विद्यापीठाशी संलग्न दौंड तालुक्यातील के जी काटारिया कॉलेजचा उल्लेख आहे. एका विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्र बोगस सापडल्याची ही पहिलीच घटना आहे. या पूर्वी गुणपत्रिकेत गुण बदलणे, गुणपत्रिकेवर नाव बदलणे अशा घटना समोर आल्या होत्या.मात्र, सर्व प्रमाणपत्र बोगस असल्याचे पाहून विद्यापीठाचे अधिकारी चक्रावून गेले होते.त्यामुळे तात्काळ याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. 

एज्युवार्ता ब्रेकिंग: बनावट डिग्री सापडल्याने विद्यापीठाचे अधिकारी चक्रावले; तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धावले

वैभव सुभाष जाधव हा  दौंड तालुक्यातील के जी काटारिया कॉलेजचा विद्यार्थीच नसल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगितले जात आहे.तसेच काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाने सुध्दा संबंधित कंपनीने केलेल्या पत्र व्यवहारला उत्तर देत हा विद्यार्थी आमचा नसल्याचे कळवले होते.त्यानंतर विद्यापीठाने ही बाबत तपासून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.संबंधित विद्यार्थी काटारिया कॉलेजचा नसल्याने या विद्यार्थाने बनावट गुणपत्रिका व डिग्री सर्टिफिकेट कुठून मिळवले.हे आता पोलीस तपासानंतरच समोर येईल.
-----------------------------------

विद्यापीठाची खरी डिग्री आणि बोगस डिग्री यांच्यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे बोगस डिग्री करणारी टोळी ही अत्यंत नवखी असल्याचे दिसून येते. डिग्री प्रमाणपत्रावर बॅचलर ऑफ वाणिज्य असा उल्लेख आहे.त्यामुळे ही डिग्री बोगस असल्याचे सहज लक्षात येते.तसेच डिग्री सर्टिफिकेट तयार करताना विद्यार्थ्याने वापरलेले अनेक फीचर्स बोगस डिग्रीत आणणे अवघड आहे.त्यामुळे हे प्रकरण समोर आले असल्याचे बोलले जात आहे.