महाविद्यालयातच विद्यार्थी बनले उद्योजक

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

महाविद्यालयातच विद्यार्थी बनले उद्योजक
Annasaheb Magar College

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील (Annasaheb Magar College) वाणिज्य विभाग, बीबीए, बीसीए यांच्यावतीने मंगळवारी बिजनेस फेअर (Business Fair) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे (Nitin Ghorpade) यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. (Latest Marathi News)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून बीएमसीसी कॉलेज पीएचडी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत साठे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. घोरपडे, वाणिज्य विभाग प्रमुख आणि उपप्रचार्य डॉ. शुभांगी औटी उपस्थित होत्या. डॉ. घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना बिजनेस फेअर या उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करून या उपक्रमाचा त्यांच्या भविष्यावर होणारा सकारात्मक उद्योगशील परिणाम याविषयी माहिती दिली. 

हेही वाचा : केवळ ९४ हजार विद्यार्थ्यांचे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन; निधीअभावी तेही रखडले

आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये बोलताना डॉ. साठे यांनी सांगितले की, भारत हा विश्व गुरुत्वाकडे जात असताना या भारतातील तरुण पिढीतील प्रत्येक तरुणाने उद्योगांमध्ये सहभाग घ्यायला हवा. अशावेळी ह्या  महाविद्यालयाच्या माध्यमातून जेव्हा अशा बिजनेस फेअर उपक्रमाचे आयोजन होते तेव्हा नवीन उद्योजक घडवण्यासाठी खूप मोलाची अशी साथ मिळत असते. महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील व्यावसायिक संस्कार घडवण्याचे एक उत्तम द्योतक असते. या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन व्यवसायक घडत असताना प्रत्येक तरुण उद्योजकाने आपल्या संवाद कौशल्यावर भर दिला द्यायला हवा.

बिझनेस फेअर या उपक्रमासाठी वाणिज्य विभागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमामध्ये ३८ व्यावसायिक स्टॉल उभारण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील प्रा. प्रतीक कामथे हे समन्वयक म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर वाणिज्य विभागातील सर्वच प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. नीता कांबळे यांनी केले.