शिक्षकाने वर्गात शिकवले ... मामाने मामीला मळ्यात मिठी मारली; विद्यार्थिनींनी केली तक्रार
याप्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात शाळेच्या संस्थाचालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या काही दिवसांत शेकडो घटना त्याज्या असतानाच आता पुण्यातून (Pune Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील आनंदगाव येथील शिक्षकाने शाळेतील तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation of a minor student) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यासह राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात शाळेच्या संस्थाचालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.संबंधित शिक्षक विनाकारण फळ्यावर मुका, किस , पाप्पी असे शब्द लिहीत असे. तसेच मामाने मामीला मळ्यात मिठी मारली, असे वाक्प्रचार करीत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा विद्या विकास मंडळची मुळशी तालुक्यातील आनंदगाव या ठिकाणी शाळा आहे. या संस्थेच्या कार्यकारी समितीला माहिती मिळाली की, संबंधित शाळेतील शिक्षक हा विद्यार्थिनींना मारहाण करतो व शिकवताना अश्लिल भाषेत बोलतो. तसेच शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार 5 सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यकरणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले. त्यावेळी १९ विद्यार्थिनींनी सदस्यांना संबंधित शिक्षकाविषयी लेखी अर्ज दिले.
जून महिन्यात शाळा सुरु झाल्यापासून हा शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना शारिरीक मारहाण व शिकविताना अश्लिल भाषेत बोलणे, तसेच शारीरिक लगट करणे, अशा प्रकारचे कृत्य करत होता. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या मनात लज्जा उत्पन्न होत होती. त्यामुळे त्यांनी संस्थेच्या कार्यकिरणी समितीकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार संस्थाचालकांनी शिक्षकाविरोधात लेखी तक्रार दिली आहे.
संबंधित शिक्षकाने शाळेत खेळणाऱ्या एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधत तिला मिठी मारली होती. त्यावेळी इतर विद्यार्थी ओरडल्याने त्याने तिला सोडले. हा शिक्षक वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जाऊन कानामध्ये बोलायचा व मोठ्याने कानात ओरडायचा. तसेच हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटत असे व त्यास विरोध केल्यास तो मुलींना मारहाण करायचा. हा शिक्षक वर्गामध्ये अश्लील कविता करायचा, असे तक्रारीत नमूद केले आहे.