परदेशात 'एमबीबीएस'चे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सेमिनारचे आयोजन
राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी आणि उपलब्ध जागा यांमध्ये खुप मोठा फरक आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांवर पाणी फेरावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी SelectYourUniversity.com ने 6 देशांतील 12 हून अधिक प्रमुख विद्यापीठांना एकत्र आणले आहे, ज्यामध्ये रशिया, जॉर्जिया, ताजिकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान या देशांचा समावेश आहे. राज्यात वैद्यकीय प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वरील देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एमबीबीएस होण्याचे (MBBS student) स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नीट परीक्षेचा निकाल (NEET exam result) लवकरच जाहीर केला जाईल. त्यापूर्वी SalectYourUniversity.com ने महाराष्ट्रातील एमबीबीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठ्या सेमिनारचे आयोजन (Organizing a seminar) केले आहे. याद्वारे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून (Opportunities for students to study medicine abroad) दिली जाणार आहे.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी आणि उपलब्ध जागा यांमध्ये खुप मोठा फरक आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांवर पाणी फेरावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी SelectYourUniversity.com ने 6 देशांतील 12 हून अधिक प्रमुख विद्यापीठांना एकत्र आणले आहे, ज्यामध्ये रशिया, जॉर्जिया, ताजिकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान या देशांचा समावेश आहे. राज्यात वैद्यकीय प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना सेमीनार मध्ये योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी भेटायला आणि प्रश्न विचारायची संधी मिळणार आहे. तसेच परदेशी वैद्यकीय शिक्षणाविषयी अधिक माहितीसाठी नांदेड, अहमदनगर, परभणी, उदगीर, धुळे, बीड, यवतमाळ, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जळना, सांगली आणि कोल्हापूर इत्यादी शहरांमध्ये भेटण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून परदेशातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी 'फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम' (FMGE) द्यावी लागते. ही एक प्रकारची वैद्यकीय परवाना परीक्षा आहे. एफएमजीई परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी राष्ट्रीय परीक्षा मंडळ (एनबीई) कडे आहे. ही वैद्यकीय परवाना परीक्षा सर्व भारतीय नागरिकांसाठी किंवा भारताबाहेर एमबीबीएसचे शिक्षण घेतलेल्या आणि आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) मार्फत प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळवू इच्छिणाऱ्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) साठी अनिवार्य आहे. या परीक्षेची देखील शिक्षण घेत असताना SelectYourUniversity.com तर्फे विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते.
eduvarta@gmail.com