SPPU : मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करा; विद्यापीठामार्फत परिपत्रक प्रसिद्ध !

शासनाने राज्यात मराठी भाषा धोरण व महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व मंत्रालय, विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व क्षेत्रीय कार्यालय व राज्य शासनाची सर्व कार्यालय यांच्यामार्फत सर्वसामान्य जनतेशी करण्यात येणारा सर्व प्रकारचा पत्रव्यवहार तसेच इतर सर्व कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करणे अनिवार्य केलेला आहे.

SPPU : मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करा; विद्यापीठामार्फत परिपत्रक प्रसिद्ध !

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) सर्व शैक्षणिक विभाग, सर्व प्रशाला व प्रशासकीय विभाग (Educational Department, All Schools and Administrative Department) येथील विभागप्रमुख,संचालक,शाखाप्रमुख (Head of Department, Director, Branch Head) यांनी आपल्या विभागात तसेच विद्यापीठांशी संलग्निक महाविद्यालय, परिसंस्था यांनी आपल्या स्तरावर मराठी भाषा धोरण व महाराष्ट्र राजभाषा अधिनियम (Marathi Language Policy and the Maharashtra Official Language Act) यांमधील तरतुदींच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

शासनाने राज्यात मराठी भाषा धोरण व महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व मंत्रालय, विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व क्षेत्रीय कार्यालय व राज्य शासनाची सर्व कार्यालय यांच्यामार्फत सर्वसामान्य जनतेशी  करण्यात येणारा सर्व प्रकारचा पत्रव्यवहार तसेच इतर सर्व कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करणे अनिवार्य केलेला आहे त्या अनुषंगाने विद्यापीठामार्फत या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, परिपत्रकात नमूद केलेला आशय संबंधित विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून घ्यावा असंही या विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.