आता UGC कडून 'नो प्लॅस्टिक' उपक्रम; विद्यापीठांसाठी सिंगल युज प्लॅस्टिकच्या वापरावर बंदीसाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध
हा उपक्रम केवळ आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीच नव्हे तर मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, कचरा व्यवस्थापन आव्हानांना तोंड देण्यासाठी, हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे होणारे प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) UGC पुढाकार घेतला आहे. UGC ने विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. (Single-use plastic banned on campus) यासंदर्भात UGC ने मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. (UGC has issued guidelines)
शैक्षणिक संस्थांमध्ये प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे
सर्व शैक्षणिक संस्था कॅन्टीन, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इन्स्टिट्यूटच्या परिसरात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालतील. संस्था एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूकता मोहीम आणि संवेदना कार्यशाळा आयोजित करतील. संस्था सर्व विद्यार्थ्यांना संस्थेत नॉन-बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या वस्तू आणू नयेत असे आदेश देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबांना प्लॅस्टिकच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांचे घर 'प्लास्टिक मुक्त' बनवण्यासाठी प्रोत्साहित करतील. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळण्यासाठी संस्था विद्यार्थ्यांसाठी मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतील. तसेच कापडी पिशव्या, कागदी पिशव्या इत्यादी पर्यायी उपायांच्या वापरास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतील.