एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी (For the 2024-25 academic year) (शैक्षणिक सत्र फेब्रुवारी 2025) ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (Open and Distance Learning) ODL आणि ऑनलाइन प्रोग्राम (Online program) ऑफर करण्यास इच्छुक आणि पात्र शैक्षणिक संस्थांसाठी एक चांगली माहिती समोर आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (
The University Grants Commission) UGC (ODL) आणि ऑनलाइन प्रोग्राम ऑफर करण्यासाठी मान्यता मिळविण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. (
The deadline for applications has been extended to November 10, 2024) याआधी ही मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत होती. अर्ज करू इच्छिणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांनी
https://deb.ugc.ac.in/ या ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, मूळ प्रतिज्ञापत्रे आणि संलग्नकांसह अर्जाची रीतसर साक्षांकित हार्ड कॉपी 25 नोव्हेंबर पर्यंत सबमीट करणे आवश्यक आहे.
UGC सचिव मनीष जोशी यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'अनेक शैक्षणिक संस्थांनी अर्जाची मुदत वाढवण्या संदर्भात विनंती केली होती. त्यानुसार या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.' अर्जाची हार्ड कॉपी संयुक्त सचिव, ब्यूरो ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, UGC, 35, फिरोज शाह रोड, नवी दिल्ली - 110001, या पत्यावर पाठवावी, अशी सूचना निवेदनात देण्यात आली आहे.