CSIR-UGC NET साठी नोंदणी प्रक्रिया सुरू 

CSIR-UGC NET साठी नोंदणी विंडो येत्या 21 मे पर्यंत खुली राहील आणि फी भरण्याची अंतिम तारीख 23 मे रोजी रात्री 11.50 पर्यंत आहे.

CSIR-UGC NET साठी नोंदणी प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (Council of Scientific and Industrial Research-University Grants Commission) राष्ट्रीय पात्रता चाचणी (CSIR-UGC NET) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट- (csirnet.nta.ac.in.) द्वारे अर्ज करू शकतात.

CSIR-UGC NET साठी नोंदणी विंडो येत्या 21 मे पर्यंत खुली राहील आणि फी भरण्याची अंतिम तारीख 23 मे रोजी रात्री 11.50 पर्यंत आहे.संयुक्त CSIR-UGC NET परीक्षा जून-2024 ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएच.डी.साठी प्रवेशासाठी घेटली जाणारी परीक्षा आहे. ही परीक्षा 25, 26 आणि 27 जून रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने होणार आहे.

पेपर  इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत होणार आहे. परीक्षेचा कालावधी 180 मिनिटे म्हणजेच तीन तासांचा आहे. पेपरमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल. परीक्षेत रसायनशास्त्र, पृथ्वी, वायुमंडलीय, महासागर आणि ग्रह विज्ञान, जीवन विज्ञान, गणित विज्ञान, भौतिक विज्ञान असे पाच पेपर असतील.

अर्ज कसा करायचा
* सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in.  ला भेट द्यावी. 
 * अर्ज भरण्यासाठी उपलब्ध लिंकवर क्लिक करा.
* 'नवीन नोंदणी' बटणावर क्लिक करा.
* आता पृष्ठाच्या तळाशी असलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि 'पुढे जाण्यासाठी येथे क्लिक करा' बटण निवडा. बटणावर क्लिक केल्यावर
* CSIR NET नोंदणी फॉर्म स्क्रीनवर उघडेल.
* नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील भरा.
* परीक्षा शुल्क डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI वापरूनच भरावे लागेल.