मराठवाडा विद्यापीठ : प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर मार्फत प्राध्यापक प्रवर्गातील ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २ मे पर्यंत केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मराठवाडा विद्यापीठ : प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Chhatrapati Sambhajinagar) मार्फत प्राध्यापक प्रवर्गातील ७३ जागांसाठी (73 posts in the professor category) भरती प्रक्रिया सुरू (Recruitment process begins) करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार येत्या २ मे पर्यंत केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलवर (Samarth Portal) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. तब्बल १५ वर्षांनंतर विद्यापीठात ही मेगा भरती होत असून, यामुळे पात्रताधारकांना मोठी संधी मिळणार आहे. 

विद्यापीठात प्राध्यापक प्रवर्गातील २८९ जागा मंजूर आहेत. सहाः स्थितीत १३० प्राध्यापक कार्यरत असून १५९ जागा रिक्त आहेत. उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी ८० टक्के पदे भरलेली असावीत, म्हणून रिक्त जागांपैकी ७३ पदे भरण्यास मान्यता दिली. या भरतीसाठी सप्टेंबर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठी ५ हजार ८१५ अर्ज ऑनलाइन, तर सुमारे ४ हजार ६०० अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले होते. मात्र, ही भरती प्रक्रिया जुलै २०२४ मध्ये रद्द करण्यात आली. 

सदरील रिक्त पदे भरण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मार्चमध्ये पद भरतीस मान्यता मिळाली, नव्या निकषांनुसार होणाऱ्या या भरतीमध्ये ८० टक्के शैक्षणिक, तर २० टक्के व्हायवा होऊन निवड प्रक्रिया होणार आहे. या भरती प्रक्रियेत प्राध्यापक ८, सहयोगी प्राध्यापक १२ व सहायक प्राध्यापकांची ५३ पदे भरली जातील. अर्जासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाक लिंक देण्यात आली आहे. २ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवरांना ऑनलाइन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे आस्थापना विभागात ९ मे पर्यंत दाखल करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.