पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला सुरूवात; नोंदणी कशी करणार

तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल.

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला सुरूवात; नोंदणी कशी करणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या बुधवारी पासून (दि. २९ मे)(Starting from 29 May) पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (Polytechnic Courses Online Admission Process) सुरुवात होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने इयत्ता दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर (The Directorate of Technical Education has announced the time table for the post-10th diploma course) केले आहे. दहावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असून त्यात सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल. या प्रवेश प्रक्रियेचा तपशील ऑनलाइन अर्ज https:// dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल. 

विद्यार्थ्यांना अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला दहावीचा निकाल जाहीर होताच सुरूवात होणार आहे. राज्यात यंदा ३००हून अधिक संस्थांमध्ये सुमारे १ लाखाहून अधिक प्रवेश क्षमता आहे. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सध्या अर्ज ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया करता येणार आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम शिकण्यासाठी मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) पर्यायही आहे. तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत असल्याने दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी गतवर्षी अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली होती. 

गेल्या वर्षी ८६ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी पाॅलिटेक्निकसाठी प्रवेश घेतला होता. मॅकेनिकल इंजिनिअरिंग, कम्युटर इंजिनियरिंग, सिव्हिल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आदी अभ्यासक्रमांना मोठी पसंती दर्शवली होती. विद्यार्थ्यांना प्रवेश फेरी दरम्यान कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसी केंद्राकडे जाण्याची यावर्षी गरज नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर दिलेला प्रवेश हा नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वतः लॉगिन मधून करता येणार आहे. जागा स्वीकृतीच्या कार्यवाहीसाठी लॉगीनमधून पूर्ण करण्याची सुविधाही दिली जाणार आहे.