पीएम-विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी मिळणार 10 लाख रुपये; असा करा अर्ज...
केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांनी या योजनेची घोषणा केली आहे. योजनेंतर्गत, पात्र विद्यार्थ्यांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून तारण-मुक्त, गॅरेंटर-मुक्त कर्ज मिळविण्याची सुविधा प्रदान केली जाईल आणि अभ्यासक्रमाशी संबंधित शिक्षण शुल्क आणि इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरून दिली जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnav) यांनी या योजनेची घोषणा केली आहे. योजनेंतर्गत, पात्र विद्यार्थ्यांना बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारण-मुक्त, गॅरेंटर-मुक्त कर्ज मिळविण्याची सुविधा देण्यात येईल आणि अभ्यासक्रमाशी संबंधित शिक्षण शुल्क आणि इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरून दिली जाईल. देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत फक्त ३ टक्के व्याज भरावे लागणार आहे.
देशातील सर्वोच्च 860 दर्जेदार उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमाचा दरवर्षी 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर भारत सरकारकडून 75% क्रेडिट गॅरंटी दिली जाईल, जेणेकरून बँकांना व्याप्ती वाढविण्यात मदत होईल.
या योजनेसाठी, 2024-25 ते 2030-31 या कालावधीत 3 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी "PM-Vidyalakshmi" या एकात्मिक पोर्टलवर शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतात.