QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी एशिया रँकिंगमध्ये SPPU 173 व्या क्रमांकांवर
QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी एशिया रँकिंग मध्ये सदर्न गटात विद्यापीठ मागील वर्षी 37 व्या क्रमांकावर होते.ते यंदा 29 व्या क्रमांकावर आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी एशिया रँकिंग 2025 (QS World University Asia Ranking 2025) बुधवारी (दि.६) दुपारी ३.३० वाजता जाहीर झाले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 173 वी रँक मिळाली (Savitribai Phule Pune University got 173rd rank) आहे. मागील वर्षाच्या तुलनेत विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये 37 ने वाढ झाली आहे. मागील वर्षी विद्यापीठ 210 व्या क्रमांकावर होते. त्यामुळे विद्यापीठ NIRF मध्ये घसरले असले तरी QS रँकिंगमध्ये विद्यापीठाचा क्रमांक वाढला आहे.
ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे NIRF रँकिंग यावर्षी घसरले. विद्यापीठ देशातील स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅटेगिरी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले. पण काही वर्षांपूर्वी 9 व्या क्रमांकावर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NRIF रँकिंगमध्ये 23 व्या क्रमांक पर्यंत घसरण झाली. परंतु, क्यू एस रँकिंग मध्ये वाढ झाल्याने विद्यापीठासाठी आशा दायक स्थिती निर्माण झाली आहे.
संशोधन व इतर क्षेत्रांमध्ये विद्यापीठाची चांगली कामगिरी असली तरी उपलब्ध मनुष्यबळामध्ये विद्यापीठ खूप मागे आहे. त्यामुळे अनेक वेळा विद्यापीठाचे रँकिंग घसरते. मात्र,लवकरच विद्यापीठात 111 प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे मनुष्यबळात वाढ होईल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.
QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी एशिया रँकिंग मध्ये सदर्न गटात विद्यापीठ मागील वर्षी 37 व्या क्रमांकावर होते. ते यंदा 29 व्या क्रमांकावर आले आहे. याबद्दल विद्यापीठाच्या IQAC चे संचालक डॉ.संजय ढोले म्हणाले, रँकिंग मध्ये वाढ झाली आहे.ही प्रगती प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनामुळे झाली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा हा परिपाक आहे.
------------------
क्यू. एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग एशिया २०२५ व क्यू. एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग एशिया २०२५ : साउथ एशिया मधील मानांकनात निश्चितच आनंदायी सुधारण झाली आहे. विद्यापीठाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शकपर पथ निर्माण होणार आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य व विविध अधिकार मंडळाचे सदस्य यांचे विद्यापीठाच्या विकासात्मक वाटचालीत महत्वाचे योगदान आहे. तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी दिलेल्या योगदानामुळे विद्यापीठाने एशिया पातळीवरील रॅकिंगमध्ये चांगले स्थान मिळवले आहे.
- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्यू. एस. ( एशिया) World University Ranking मधली झेप ही निश्चितच उत्साहवर्धक असून भविष्यात दिशादर्शक ठरणार आहे.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ