राज्यात विशेष शिक्षकांच्या ४ हजार ८६० पदांची निर्मिती होणार; राज्य सरकारचा निर्णय 

राज्यभरात विशेष शिक्षकांच्या ४ हजार ८६० पदांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची स्वप्न पाहाणाऱ्या बेरोजगार तरूणांना ही महत्त्वाची संधी प्राप्त होणार आहे. 

राज्यात विशेष शिक्षकांच्या  ४ हजार ८६०  पदांची निर्मिती होणार; राज्य सरकारचा निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून विशेष शिक्षक पदाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यभरात विशेष शिक्षकांच्या ४ हजार ८६०  पदांची (4 thousand 860 posts will be filled) निर्मिती होणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची स्वप्न पाहाणाऱ्या बेरोजगार तरूणांना ही महत्त्वाची संधी प्राप्त होणार आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागातंर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागातंर्गत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती पार पडली असून काही उमेदवारांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे.तर काही उमेदवार आणखीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

शिक्षक होण्यासाठी D. Ed व B. Ed उत्तीर्ण उमेदवारांना TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पास होणे गरजेचे आहे. त्यानंतर बीएड धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. राज्यातील विविध खाजगी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद शाळा आणि महापालिकांच्या शाळेत सरकारकडून विशेष शिक्षक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.