IOCL मध्ये 1800 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया

IOCL 1 हजार, 820  शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

IOCL मध्ये 1800 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया
IOCL

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)  मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची माहिती समोर येत आहे. IOCL 1 हजार, 820  शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 16 डिसेंबर पासून नोंदणी सुरू होईल आणि या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2024 आहे. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शिकाऊ पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना IOCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवार iocl.com. या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. IOCL च्या या पदांवर उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीद्वारे केली जाईल. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असेल आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. काही वेळाने तुम्ही वेबसाइटवरून त्याचे तपशील जाणून घेऊ शकता. 

हेही वाचा : पीएच. डी. च्या राज्यभर पेटलेल्या दिव्यावर फुकर ; अजित पवारांची दिलगिरी

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमाही केलेला असावा. या रिक्त जागा ट्रेड, ग्रॅज्युएट आणि टेक्निकल अप्रेंटिस पदांसाठी आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

तसेच ज्या उमेदवारांनी आधीच कोणत्याही उद्योगात शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे. ते या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत. ज्यांनी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ शिकाऊ म्हणून काम केले आहे, असे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.