Mumbai University : अखेर सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, थेट पुढच्या वर्षीचा मुहूर्त

मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम यापुर्वीही जाहीर केला होता. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी मदतान होणार होते. तर १३ सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल होता.

Mumbai University : अखेर सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, थेट पुढच्या वर्षीचा मुहूर्त
Mumbai University Senate Election

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीला (Senate Election) अखेर मुहूर्त मिळाला आहे. जवळपास दोन महिन्यांपुर्वी निवडणूक अचानक स्थगित केल्यानंतर मोठे राजकारण रंगले होते. त्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक (Tentative Schedule) जाहीर केले आहे. त्यानुसार आता या निवडणुका थेट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात घेतल्या जाणार आहेत. (Election News)

 

मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम यापुर्वीही जाहीर केला होता. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी मदतान होणार होते. तर १३ सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल होता. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली होती. मात्र, अचानक ही निवडणूक स्थगित करण्याची घोषणा प्रशासनाने केली. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परदेशात कॅम्पस ?

 

प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने तातडीने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत न्याने मतदार नोंदणी केली जाणार आहे.

 

याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेल्यांना पुन्हा मतदार नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाही. याआधी जर मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी या लॉगिन आयडीद्वारे अर्ज केले असतील त्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करू शकतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक

३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ - नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरणे

१ डिसेंबर २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२४ - मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिध्द करणे 

२६ फेब्रुवारी २०२४ - अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

२९ फेब्रुवारी २०२४ - निवडणूक अधिसूचना जाहीर करणे

११ मार्च २०२४ - उमेदवारी अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 

१८ मार्च २०२४ - उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची दिनांक

२० मार्च २०२४ - उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे

२१ एप्रिल २०२४ -  सिनेट निवडणूकीसाठी मतदान (सकाळी ९ ते सायंकाळी ५)

२४ एप्रिल २०२४ - मतमोजणी व निकाल

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k