MAHA TET 2024 : अंतिम 'उत्तरसूची' प्रसिद्ध

जे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत त्यांना परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ http://mahatet.in वर पीडीएफ स्वरूपात उत्तरसूची पाहता येणार आहे. 

MAHA TET 2024 : अंतिम 'उत्तरसूची' प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Examination Council) महा टीईटी २०२४ परीक्षेची (Maha TET 2024 Exam) अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध (Final Answer Kay published) करण्यात आली आहे. जे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत त्यांना परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ http://mahatet.in वर पीडीएफ स्वरूपात उत्तरसूची पाहता येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -१ व पेपर -२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेसाठी पेपर १ व पेपर २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांकडून १६ डिसेंबरपर्यंत परीक्षा परिषदेने आक्षेप मागवले होते. त्यानंतर आता अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पेपर I आणि पेपर II (गणित/विज्ञान आणि सामाजिक शास्त्र) साठी MAHA TET 2024 अंतिम उत्तरसूची  प्रकाशित केली आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू आणि गुजराती अशा सर्व भाषांमध्ये अंतिम उत्तरसूची उपलब्ध आहे. ही उत्तरसूची उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून काम करते.

प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

अशी बघता येणार अंतिम उत्तरसूची 

महा टीईटी 2024 ची अंतरिम उत्तरसूची पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://mahatet.in/ ला भेट द्या. तिथे समोर दिसणाऱ्या 'महाटेट २०२४ अंतिम उत्तरसूची बघण्यासाठी येथे क्लिक करा' या लिंकवर जा. तिथे तुम्हाला तुमचा पेपर आणि विषय निवडावे लागेल. तुमचा पेपर आणि विषयावर क्लिक केल्यावर समोर तुम्हाला पीडीएफ स्वरुपात उत्तरसूची दिसेल. त्यानुसार तुम्ही लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे तपासू करू शकता