रेल्वेत ५,६४७ जागांसाठी भरती सुरू; ३ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत
“अप्रेंटिस” पदांच्या एकूण ५ हजार ६४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर पर्यंत देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय उत्तर पूर्व सीमा रेल्वे (Indian North East Frontier Railway) अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या (Recruitment of Apprentice Posts) एकूण ५ हजार ६४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार असून अर्ज करण्यास ३ डिसेंबर (Last date to apply is 3rd December) पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, या भरती मोहिमेअंतर्गत विविध पदांच्या ५,६४७ जागा भरल्या जाणार आहेत. त्याचा कालावधी हा पूर्ण एक वर्षाचा असणार आहे. इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ https://nfr.indianrailways.gov.in/ वर जाऊन आपल्या अर्ज भरू शकतात. त्यासाठी उमेदवाराला १०० रुपये अर्ज शुल्क आकारला जाणार आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड १२ उत्तीर्ण व ITI चे शिक्षण पूर्ण केलेले असणे अपेक्षित आहे. तसेच उमेदवाराचे वय हे १५ ते २४ वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारांची निवड मॅट्रिकमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित असेल (किमान 50% एकूण गुणांसह उत्तीर्ण) + ITI असलेल्या उमेदवारी करायची निवड केली जाणार आहे. अंतिम पॅनेल मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या सरासरीच्या आधारे असणार आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) साठी, मॅट्रिक (किमान 50% एकूण गुणांसह) + 12 वी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ITI साठी, NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या तात्पुरत्या राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी गुणांच्या एकत्रित नमूद केलेले सरासरी गुण/गुण मोजले जातील. जेव्हा समान गुण असलेले दोन किंवा अधिक उमेदवार असतील, तेव्हा वयाने मोठ्या उमेदवाराला उच्च स्थान दिले जाईल. जर त्यांची जन्मतारीख सुद्धा सारखीच असेल, तर आधी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा प्रथम विचार केला जाईल.