CUET : परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरू

वेळापत्रकानुसार, परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपल्यानंतर, 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुधारणा विंडो उघडली जाईल.

CUET : परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा PG 2025 साठी (Common University Entrance Test PG 2025) अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. (The registration process for the exam has also started) या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारले जातील. पात्र आणि परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी https://nta.ac.in/ आणि https://exams.nta.ac.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपल्यानंतर 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुधारणा विंडो उघडली जाईल. उमेदवार विहित तारखेच्या आत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर कोणतीही सुधारणा स्वीकारली जाणार नाही. 

CUET PG परीक्षा 13 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतली जाईल. एकूण 157 विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. देशभरातील 312 शहरांमध्ये आणि भारताबाहेरील 27 शहरांमध्ये याचे आयोजन केले जाणार आहे. 

CUET PG परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम https://exams.nta.ac.in/CUET-PG/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. आता, CUET PG 2025 नोंदणी विंडो उघडेल या लिंक पर्यायावर क्लिक करा. येथे उपलब्ध असलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा अर्ज भरा. आता सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या नमुन्यात अपलोड करा आणि तुमच्या रेकॉर्डसाठी एक प्रत ठेवा.
CUET PG 2025 परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल. परीक्षेच्या गुणांकन योजनेनुसार, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातील. तर, चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. मात्र, उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.