मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा खोटी?;राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक,चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी 

चंद्रकांत पाटील यांनी मुलींचे सर्व शुल्क शासनातर्फे भरण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप या घोषणीची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 

मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा खोटी?;राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक,चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and technical education minister Chandrakant Patil)यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील मुलींना मोफत शिक्षण (girl student free education)देण्याची घोषणा केली होती. तसेच जून 2024 पासून मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, एमबीए (Medical, Engineering, Law, MBA)आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे सर्व शुल्क शासनातर्फे भरण्याचे जाहीर केले होते.परंतु, अद्याप  या घोषणीची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी सर्व शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे गुरूवारी (Nationalist Congress)राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन करण्यात आले.तसेच पाटील यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी होत नसल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 

खासगी कारणांमुळे दिवसेंदिवस शिक्षण महाग होत चालले आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे.शासनातर्फे 8 लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचे 50 टक्के शुल्क भरले जाते.तरीही काही विद्यार्थ्यांना उर्वरित शुल्क भरणे शक्य होत नाही.त्यामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारतात.ही बाब विचारात घेऊन शासनातर्फे मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनातर्फे घेतला जाणार असल्याची माहिती  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत एका भाषणात केली होती.मात्र, आता त्यांची अंमलबजावणी का झाली नाही. ही घोषणा केवळ लोकसभा निवडणुकीसाठी केली गेली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खोट्या घोषणा देऊन चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील मुलींची फसवणूक केली आहे.त्यामुळे पाटील यांनी राजीनामा द्यावा,असही मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.