बी.ए/बी.एस्सी-बी.एड सीईटी साठी अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ 

इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी १५ एप्रिलपर्यंत अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर अर्ज करू शकतात.

बी.ए/बी.एस्सी-बी.एड सीईटी साठी अर्ज भरण्यास पुन्हा एकदा  मुदतवाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (Maharashtra State Common Entrance Test) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या बी.ए/बी.एस्सी-बी.एड (B.A/B.Sc-B.Ed) अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेकरीता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यास 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी १५ एप्रिलपर्यंत (Extension till 15th April) अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर अर्ज करू शकतात. 

उमेदवार व पालकांकडून बी.ए/बी.एस्सी-बी.एड अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार लक्षात घेवून महा- बी.ए/बी.एस्सी-बी.एड (४ वर्ष एकात्मिक) सीईटी २०२४ साठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

बी.ए/बी.एस्सी-बी.एड  साठी परीक्षेच्या नोंदणीची अंतिम मुदत 30 मार्च देण्यात आली होती, आता ही मुदत १५ एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. तर परीक्षा येत्या  १८ मे रोजी घेण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी cetcell.mahacet.org संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या. 

अर्ज कसा करावा

सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. होम पेजवर दिलेला MAH बी.ए/बी.एस्सी-बी.एड  CET 2023 टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा. नवीन उमेदवारांना नोंदणी करावी लागेल तर इतरांना पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. महत्त्वाची ओळखपत्रे भरून फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.