विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या ओव्हर टाईमच्या रक्कमेत प्रतितास 15 रुपये वाढ 

कर्मचाऱ्यांना पूर्वी दिल्या जात असलेल्या ओव्हर टाईमच्या रकमेत प्रति तास 15 रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या ओव्हर टाईमच्या रक्कमेत प्रतितास 15 रुपये वाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विविध प्रशासकीय विभागांमध्ये केवळ 40 टक्के कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना (employees)अनेक वेळा नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ काम करावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पूर्वी दिल्या जात असलेल्या ओव्हर टाईमच्या (Over time) रकमेत प्रति तास 15 रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अतिकालिक भत्त्यात वाढ करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार सरसकट प्रति तास 15 रुपये वाढ देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

विद्यापीठ कार्यालयात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना 80 रुपये किंवा 90 रुपये प्रति तास अतिकालिक भत्ता दिला जातो. परंतु,  या भत्त्यात वाढ झाल्यामुळे आता  कर्मचाऱ्यांना 95 रुपये तर काहींना 105 रुपये प्रतितास ओव्हर टाईम मिळणार आहे.
--------------
विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 40 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा दान पडतो. परिणामी काही कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कार्यालयात अधिक काळ थांबून काम करावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पूर्वीपासून अतिकालिक भत्ता दिला जातो. या भत्त्यात पंधरा रुपये प्रति तास वाढ करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात आला आहे. 

- डॉ.देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषद, सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ