सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरतीला मुदतवाढ :16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

उमेदवारांना आता येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची हार्ट कॉपी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरतीला मुदतवाढ :16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध विभागांमधील 111 पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात असून सामाजिक व समांतर आरक्षणाच्या (Social and parallel reservations)अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी त्यात काही दुरूस्ती केली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे,असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे (Registrar Dr. Vijay Khare) यांनी सांगितले. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 25 जानेवारी रोजी समांतर आरक्षणासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला.त्यानुसार भरती करताना सामाजिक व समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे, असे राज्य शासनातर्फे अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले. समांतर आरक्षणामध्ये 30 टक्के महिला आरक्षण, 4 टक्के दिव्यांग ,5 खेळाडू आदी आरक्षणाबाबत स्पष्टता आहे. त्यामुळे या पदांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण व इतर सर्व बाबींमध्ये बदल केला असून ही माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

हेही वाचा: शाळेत मराठी विषय सक्तीचाच पण केवळ कागदावर...

डॉ. खरे म्हणाले, प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र सामाजिक व समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याने उमेदवारांना अर्ज करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना आता येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची हार्ट कॉपी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार आहे. सुधारित माहिती admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.