12th Exam 2025 : मुलांना प्रश्नांची उत्तरे सांगणारा पर्यवेक्षक शिक्षण विभागाच्या जाळ्यात 

पहिल्याच दिवशी नंदूरबार जिल्ह्यातील लोणखेडा या परीक्षा केंद्रावर खुद्द पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगत असताना शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर नंदूरबारचे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी लोणखेडा केंद्र संचालक यांना संबंधित पर्यवेक्षकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिली आहेत. 

12th Exam 2025 : मुलांना प्रश्नांची उत्तरे सांगणारा पर्यवेक्षक शिक्षण विभागाच्या जाळ्यात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा (12th standard exams) काॅपीमुक्त करण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मंगळवार दि. ११ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नंदूरबार जिल्ह्यातील लोणखेडा या परीक्षा केंद्रावर खुद्द पर्यवेक्षकच (Examination Center Supervisor) विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगत असताना शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर नंदूरबारचे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी लोणखेडा केंद्र संचालक यांना संबंधित पर्यवेक्षकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिली आहेत. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी ११ फेब्रुवारी रोजी इंग्रजी या विषयाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी आपल्या लोणखेडा केंद्र क्रमांक- ६२५ मधील वर्ग क्रमांक- ४ मध्ये भटु कुवर हे पर्यवेक्षक म्हणुन कार्यरत असुन त्यांनी सुमारे १२:१० या वेळेत प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे सदर वर्गातील झुम मिटींग अॅप मधील चित्रीकरणात निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य त्या कलमाअंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे शिक्षणाधिकारी यांनी केंद्र संचालकांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. 

विधि व न्याय विभाग सन १९८२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ महाराष्ट्र विद्यासपीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८२ नुसार सदर कर्मचाऱ्याविरुध्द नजीकच्या पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून सदर पर्यवेक्षका विरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यासाठी संबंधित संस्था/ मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे. केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास दोन दिवसांच्या आत सादर करावा, असे या पत्रात म्हटले आहे. 

परीक्षेत कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामिन पात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. सन 1982 च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.  बोर्डाचे नियम न पाळल्यास विद्यार्थ्यांवर थेट कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे. आता या पर्यवेक्षकावर कोणती कारवाई केली जाते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार