IBPS RRB लिपिक भरतीच्या प्राथमिक परीक्षेचे स्कोअरकार्ड प्रसिद्ध
उमेदवार IBPS RRB लिपिक भरतीच्या प्राथमिक परीक्षेचे स्कोअरकार्ड ५ ऑक्टोबरपर्यंत डाउनलोड करू शकतील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने (Institute of Banking Personnel Selection) IBPS RRB लिपिक भरतीच्या प्राथमिक परीक्षेचे स्कोअरकार्ड (Exam Scorecard) प्रकाशित केले आहे. या भरतीमध्ये सहभागी झालेले सर्व उमेदवार (candidates) IBPS च्या https://ibps.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला निकाल (result) तपासू शकतात.
उमेदवार वेबसाइटवरून ५ ऑक्टोबरपर्यंत प्रिलिम्स स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील. स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने ही प्रक्रिया करावी लागणार आहे.
IBPS RRB लिपिक मुख्य परीक्षा 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठीचे प्रवेशपत्र (Hallticket) २८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. IBPS लिपिक मुख्य परीक्षेत 200 प्रश्न असतील. परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. मुख्य परीक्षेत रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा आणि संख्यात्मक क्षमता यावरून प्रश्न विचारले जाणार आहे.
IBPS RRB लिपिक स्कोअरकार्डवर उमेदवाराचे नाव, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, सामाजिक वर्ग, प्रत्येक विभागात मिळालेले गुण, एकूण गुण, पात्रता स्थिती, प्रत्येक विभागासाठी IBPS लिपिक कट ऑफ आणि एकूण कट ऑफ गुण हा सर्व तपशील नमूद करण्यात आला आहे.
IBPS ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO), लिपिक आणि स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी तात्पुरती वाटप यादी प्रकाशित केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी झालेले उमेदवार अधिकृत IBPS वेबसाइटवर त्यांची वाटप स्थिती तपासू शकतात. हे तात्पुरते वाटप गुणवत्ता-सह-प्राधान्य प्रणालीवर आधारित आहे. ज्या प्रकरणांमध्ये उमेदवारांना समान गुण आहेत, त्यांच्या गुणवत्तेचा क्रम त्यांच्या जन्मतारखेनुसार निश्चित केला जाईल.