'हिंदी' भारतातील सर्वाधिक रोजगाराची भाषा: प्रा. नवनीत चौहान

हिंदी भाषेचा अधिकाधिक वापर करून ती जागतिक भाषा बनवली पाहिजे.

'हिंदी' भारतातील सर्वाधिक रोजगाराची भाषा:  प्रा. नवनीत चौहान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भाषांतर, जाहिरात इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. आपल्या अभिनय शैलीतून ते करणे शक्य आहे,. तसेच हिंदी चित्रपट आणि गाणी हे आज रोजगाराचे महत्त्वाचे स्रोत (Hindi movies and songs are important sources of employment today) झाले आहेत. हे कौशल्य विद्यार्थ्यांनी अवगत केले पाहिजे. असे मत प्रा. डॉ.नवनीत चौहान (Prof. Dr. Navneet Chauhan) यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) हिंदी विभागातर्फे (Department of Hindi) आयोजित केलेल्या हिंदी दिन व पुस्तक प्रकाशन सोहळ्या निमित्त आयोजित (Hindi Day and Book Release Ceremony) कार्यक्रमात डॉ.नवनीत चौहान बोलत होते. कार्यक्रमास  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, केरळ विद्यापीठाचे तिरुवनंतपुरमचे प्रा.आर.जयचंद्रन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.सुधाकर बोकेफोडे, हिंदी विभागप्रमुख प्रा.सदानंद भोसले आदी उपस्थित होते.

डॉ.नवनीत चौहान यांनी हिंदी भाषेची भाषिक समृद्धता आणि उपयुक्ततेचे महत्व सांगितले. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षणही दिले.

डॉ. पराग काळकर यांनी हिंदी भाषेचा अधिकाधिक वापर करून ती जागतिक भाषा बनवली पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी डॉ.सदानंद भोसले लिखित 'शूल पर उमेद के फूल' आणि डॉ. नितीन लिखित 'द ग्रेट वॉर ऑफ ह्युमन राइट्स' या हिंदी कविता संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी हिंदी विभागाचे सर्व शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी व सर्व महाविद्यालयांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख प्रा. सदानंद भोसले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.महेश दवंगे यांनी केले.