उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची बदली 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी बी. वेणूगोपाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची बदली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी (Secretary Department of Higher and Technical Education Vikas Chandra Rastogi) यांची बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी बी. वेणूगोपाल रेड्डी (B. Venugopal Reddy) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रस्तोगी यांची कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रस्तोगी यांच्यासह १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आला आहेत. यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, राष्ट्रीय उच्च तंत्र शिक्षण अभियान कार्यकारी अधिकारी निपून विनायक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाने बदलीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. १९९५ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. रस्तोगी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या जागी बी. वेणूगोपाल रेड्डी, भाप्रसे यांची नियुक्ती केली गेली आहे. आपण आपल्या सध्याचा पदाचा कार्यभार रेड्डी यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार जयश्री भोज भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा. 

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून खांदेपालट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माजी. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यामुळे चर्चेत आलेले पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आलेल्या वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडे वन विभाग अतिरिक्त सचिव पदीचा भार कायम ठेवण्यात आला आहे.