नव भारत साक्षरता अंतर्गत जिल्हानिहाय असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण
उल्लास मोबाईल अॅपवर (Ullas Mobile App) नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग व प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन (Tagging and direct learning) करणेबाबत सूचना द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे पत्र शिक्षण संचालनालयाने (Directorate of Education) संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करणेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपण आपल्या जिल्ह्यातील शाळांना सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रांमध्ये असाक्षर व्यक्ती व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करून असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास मोबाईल अॅपवर (Ullas Mobile App) नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग व प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन (Tagging and direct learning) करणेबाबत सूचना द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे पत्र शिक्षण संचालनालयाने (Directorate of Education) संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सन २०२२ ते २०२७ या कालावधीत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (ULLAS NBSK) ची अंमलबजावणी करणे व या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर विविध समित्यांची स्थापन करण्यात आलेली आहे.
वार्षिक कार्यनियोजन व अंदाजपत्रक सन २०२५-२६ साठी राज्याकरिता ६ लक्ष २० हजार एवढे असाक्षरांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्ह्याकरिता असाक्षर उद्दिष्ट वितरण करण्यात आले आहे. त्यानुषंगाने असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास मोबाईल अॅपवर करण्यासाठी असाक्षरांचे सर्वेक्षण, नोंदणी, असाक्षर व स्वयंसेवक यांची जोडणी व प्रत्यक्ष अध्य-अध्यापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमार्फत सन २०२५ मध्ये प्रवेशपात्र/दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण व शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासोबत असाक्षर व्यक्तींचेही सर्वेक्षण करण्यात यावे, असे शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे.