सीईटी सेलचा विद्यार्थ्यांना दिलासा, जातवैधता प्रमाणपत्रासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिक, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. 

सीईटी सेलचा विद्यार्थ्यांना दिलासा, जातवैधता प्रमाणपत्रासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (Socially and economically backward classes) (एससी, ओबीसी) विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ साठी (Academic year 2025-26) प्रवेश प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिक, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. 

शासनाने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. याचा फायदा राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. ६ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करता येईल. संगणक प्रणालीत सुरळीतपणे प्रक्रिया पार पडत नाही. ऑनलाइन प्रक्रियेत त्रुटी पूर्ततेसाठीही अडचणी येतात. त्यामुळे 

अधिनियमाच्या कलम पाचनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात, तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीत दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले 

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एसईबीसी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता असते. या मुदतवाढीचा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे फॉर्म भरल्यानंतरही जात पडताळणीसाठी अर्ज केला तरी त्यांना ते मिळू शकणार आहे.