"वन बिलियन राईस" रॅलीद्वारे महिला सक्षमीकरण, सामाजिक जागरूकतेचा संदेश
कर्वे समाज सेवा संस्था व सी.वाय.डी.ए. संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "वन बिलियन राईस" रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कर्वे समाज सेवा संस्था (Karve Social Service Institute) व सी.वाय.डी.ए. संस्था पुणे (C.Y.D.A. Institute Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने "वन बिलियन राईस" रॅलीचे (One Billion Rice Rally) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान विकसित होण्यास मदत झाली तसेच महिला सक्षमीकरणाचा महत्त्वाचा संदेश (Message of women empowerment) समाजापर्यंत पोहोचवण्यात आला, असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
रॅलीमध्ये महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, विकास यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे आणि सामाजिक गाणी गाऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला.
ही रॅली कर्वे समाज सेवा संस्था महाविद्यालयापासून ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकापर्यंत काढण्यात आली. यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ. महेश ठाकूर, डॉ. शर्मिला रामटेके, प्रा. चयन पारधी, प्रा. चेतन दिवाण तसेच सी.वाय.डी.ए. संस्थेचे प्रितेश कांबळे, आदी मान्यवर व महाविद्यालयीन विद्यार्थी या उपस्थित होते.