महिला पोलीस भरतीत चेंगराचेंगरी; मुली जखमी,पालक संतप्त

पोलिस भरतीच्या ५३१ जागांसाठी हजारो मुली पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात धावण्याच्या मैदानी चाचणीसाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी मैदानी चाचणी दरम्यान गोंधळ उडाल्याने पोलीस होण्याची स्पप्न पाहाणाऱ्या महिला उमेदवार या चेंगराचेंगरीत जखमी झाल्या आहेत. 

महिला पोलीस भरतीत  चेंगराचेंगरी; मुली जखमी,पालक संतप्त

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यात महिला पोलिस भरतीच्या (Pune Women Police Recruitment) मैदानी चाचणी (Ground Test) दरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या पोलिस भरतीच्या ५३१ जागांसाठी हजारो मुली पोलिस मुख्यालयाच्या (Pune Police Headquarters) प्रांगणात धावण्याच्या मैदानी चाचणीसाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी मैदानी चाचणी दरम्यान गोंधळ उडाल्याने पोलीस होण्याची स्पप्न पाहाणाऱ्या महिला उमेदवार या चेंगराचेंगरीत जखमी (Female candidate injured in stampede) झाल्या आहेत. 

पुणे पोलीस विभागाच्या वतीने कारागृह महिला पोलीस भरतीच्या ५३१ जागांसाठी ३ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांची शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात धावण्याची चाचणी आयोजित करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाला नोंदणी केलेले सर्व उमेदवार मैदानी चाचणीसाठी येणार असल्याची कल्पना तर नक्कीच असणार मग योग्य नियोजन का केले गेले नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बेरोजगारीचे विदारक चित्र शासनाच्या समोर आले आहे. 

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यावरून मुली आत मध्ये पळत सुटल्या यावेळी चेंगराचेंगरी आणि मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांची गर्दी झाली. या धावपळीत अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या. यावेळी उमेदवरांचे पालक प्रशासनावर संतप्त झाले. पालकांच्या डोळ्यांसमोर, पोलीस व्हायचे स्वप्न घेऊन आलेल्या आपल्या मुलींच्या अशा संघर्षामुळे त्यांच्या मनामध्ये दुफळी निर्माण झाली.