सीईटी परीक्षेला सुरुवात; नवीन वेळापत्रकानुसार तुमची परीक्षा कधी..

इंजिनिअरिंग, फार्मसी कृषी अभ्यासक्रमाची एमएचटी सीईटी एलएलबी आणि एमबीएच्या सीईटीसाठी विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिवाय बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या अर्जासाठी अद्याप  नोंदणी सुरू असून, २० मार्च हा शेवटचा दिवस आहे. 

सीईटी परीक्षेला सुरुवात; नवीन वेळापत्रकानुसार तुमची परीक्षा कधी..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात (Entrance exams for professional courses begin) झाली आहे. यंदा विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी तब्बल १३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी कृषी अभ्यासक्रमाची एमएचटी सीईटी एलएलबी आणि एमबीएच्या सीईटीसाठी विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी (Record number of students register for LLB and MBA CET) केली आहे. शिवाय बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या अर्जासाठी अद्याप  नोंदणी सुरू असून, २० मार्च हा शेवटचा दिवस आहे. 

सीईटी प्रवेश परीक्षांमध्ये एकूण १९ व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. त्यानुसार त्या त्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेचे नियोजन प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश परीक्षा प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षा प्रक्रियेला सुरुवात झाली असून एमएड आणि एमपीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षा आज रोजी संपन्न झाल्या आहेत. तर एमसीए अभ्यासक्रमाची सीईची २३ मार्चला आणि हॉटेल मॅनेटमेंटच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची सीईटी २७ मार्चला होणार आहे. सीईटीद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश पूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा शेवट ४ मे रोजी एलएलबी ३ वर्षे परीक्षेने होणार आहे. 

एलएलबी ५ वर्षांची सीईटी परीक्षा २०२५ आणि एलएलबी ३ वर्षांची सीईटी परीक्षा २०२५ स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे. एलएलबी ३ वर्षे प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहाता ही परीक्षा ३ आणि ४ मे अशा दोन दिवस घेतली जाणार आहे. तर ५ वर्षांची एलएलबी सीईटी परीक्षेची तारीख २८ एप्रिल २०२५ आहे. महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर एमएच सीईटी कायदा २०२५ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.