सुपरस्टार्सच्या मुलांना आयुष्यभर लॉन्च करता येत नाही; यशपाल शर्मा यांचे SPPU मध्ये वक्तव्य

सुपरस्टार्सच्या मुलांना एकदा- दोनदा लॉन्च केले जाऊ शकते.मात्र, त्यांना आयुष्यभर लॉन्च करता येत नाही.सिनेक्षेत्रात टिकण्यासाठी या मुलांमध्ये स्वत:ला सिध्द करण्याची क्षमता असयाला हवी .तेव्हाच ते या क्षेत्रात टिकू शकतात,

 सुपरस्टार्सच्या मुलांना आयुष्यभर लॉन्च करता येत नाही; यशपाल शर्मा यांचे SPPU मध्ये वक्तव्य

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University)आयोजित बनारस लिट फेस्टिव्हलच्या (Banaras Lit Festival)माध्यमातून पुणे व काशी येथील साहित्याचे आदान- प्रदान होणे ही अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे.मात्र, चित्रपटासारख्या माध्यमांमध्ये दर्जेदार साहित्यकृतीचा हव्या तेवढ्या प्रमाणात अंतर्भाव केला जात नाही ही वस्तूस्थिती असली तरी काही निवडक चित्रपट दिग्दर्शक (Film director)चित्रपटात साहित्याला सामावून घेत आहेत, असे मत अभिनेता यशपाल शर्मा (Actor Yashpal Sharma)यांनी व्यक्त केले. तसेच सुपरस्टार्सच्या मुलांना एकदा- दोनदा लॉन्च केले जाऊ शकते.मात्र, त्यांना आयुष्यभर लॉन्च करता येत नाही.सिनेक्षेत्रात टिकण्यासाठी या मुलांमध्ये स्वत:ला सिध्द करण्याची क्षमता असयाला हवी .तेव्हाच ते या क्षेत्रात टिकू शकतात,असेही यशपाल शर्मा म्हणाले. 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,काशी साहित्य कला उत्सव, पुण्यातील 'प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल' आणि नवभारत निर्माण समितीच्या वतीने हिंदी पंधरवाड्याच्या निमित्ताने आयोजित 'बनारस लिट फेस्टिव्हल'च्या उद्घाटन कार्यक्रमात यशपाल शर्मा बोलत होते.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे,रसायनशास्त्र विभागाचे डॉ.अविनाश कुंभार, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंह , हिंदी विभाचे प्रमुख डॉ.सदानंद भोसले, काशी साहित्य कला उत्सवचे सचिव बृजेश सिंह ,प्रसिध्द शायर मदन मोहन दानिश ,मीडिया थीम एंड रिसर्च सेंटरचे प्रमुख शशिभूषण तिवारी आदी उपस्थित होते.

यशपाल शर्मा म्हणाले, साहित्य व संस्कृतीची आदान प्रदान होणे आवश्यक असून सर्वांनी वाचन संस्कृती जपली पाहिजे. दूर्दैवाने चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेता साहित्य वाचत नाहीत.त्यात पूर्वी वाचन करणाऱ्या अनेकांनी आता वाचने बंद केले आहे,ही खेदजनक बाब आहे.

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, काशी ही देशाची सांस्कृतिक राजधानी असून पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.साहित्याच्या निमित्ताने पुणे आणि काशी ही दोन मोठी शहरं एकत्र आली आहेत.त्याचा भारतीय ज्ञान परंपरा या दृष्टीने पुढील काळात निश्चितच फायदा होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सदानंद भोसले व बृजेश सिंह यांनी केले.उद्घाटन सत्राचे आभार डॉ. राजेंद्र घोडे यांनी मानले तर राहूल दांडगे यांनी आभार मानले. 
-------------------------

मोबाईल हातात आल्याने वाचन कमी झाले असून त्याचे समाजावर दूरगामी परिणाम होत आहे.मात्र, आपल्याला पुन्हा साहित्याकडे वळावे लागणार आहे.अन्यथा माणूस माणसापासून दूरावत जाईल.संस्कृती हीच आपली संपत्ती असून त्याचा विसर पडत असल्याने या संस्कृतीला एकदा उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

- डॉ.राजेंद्र सिंह, विश्वस्त, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल 

---------------------------------

काव्यरसिक झाले मंत्रमुग्ध 

'बनारस लिट फेस्टिव्हल'अंतर्गत आयोजित काव्य संमेलनात प्रसिध्द कवी मदन मोहन दानिश यांच्यासह स्वयं श्रीवास्तव, सोन रुपा विशाल, असलम हसन, विशाल बाग, दान बहादुर सिंह, प्रशांत सिंह ,अभिषेक तिवारी, डॉ.सदानंद भोसले,शशिकांत दूधगावकर यांनी बहारदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.प्रत्येक कवितेला प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध होऊन प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच अभिनेता यशपाल शर्मा, लेखक मकरंद साठे व विक्रम कर्वे यांनी साहित्य नाटक आणि चित्रपट यावर सविस्तर मनोगत व्यक्त केले.