सीबीएसई बोर्डाच्या निकालात बदल : मुख्याध्यापकांकडून स्वागत 

सीबीएसई बोर्डाने  २०२४ च्या परीक्षांमध्ये  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही ओवरऑल डिवीजन किंवा डिस्टिंक्शन देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सीबीएसई बोर्डाच्या निकालात बदल : मुख्याध्यापकांकडून स्वागत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Central Board of Secondary Education : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने  (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा (10th and 12th) निकाल जाहीर करण्याबाबत घेतलेला निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या गुणांची एकमेकांशी तुलना (comparison of students' scores) केली जाणार नाही. तसेच शाळांमध्ये सुध्दा पहिला , दूसरा, तिसरा  कोण याबाबत असणारी मोठी उत्सुकता राहणार नाही. विद्यार्थी परीक्षेच्या तणावाखाली (students under exam stress) असणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे,अशा प्रतिक्रिया सीबीएसई बोर्ड शाळेच्या (CBSE Board School) मुख्याध्यापकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. 

हेही वाचा : CBSE बोर्ड परीक्षेच्या निकालात बदल ; आता ओवरऑल डिवीजन / डिस्टिंक्शन नाही

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डाने  २०२४ च्या परीक्षांमध्ये  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही ओवरऑल डिवीजन किंवा डिस्टिंक्शन देणार नसल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी काही उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वर्गात मन लावून अभ्यास करणाऱ्या आणि परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ श्रेणी किंवा क्लासच्या स्वरूपात मिळत नाही. हे गुणवंत विद्यार्थी कौतुकापासून वंचित राहतात, असे मत काही अभ्यासक व्यक्त करत आहेत.
-----------------------------

सीबीएसईने निकाल जाहीर करताना काही बदल करण्याचा निर्णय घेतला असून तो स्वागतार्ह आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना होणार नाही.आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही ओवरऑल डिवीजन किंवा डिस्टिंक्शन देणार नाही.तसेच या निर्णयामूळे विद्यार्थ्यांचा कोणताही तोटा होणार नाही. 
- गायत्री जाधव , मुख्याध्यापिका , प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल,इंद्रायणीनगर

----------------------
सीबीएसईकडून विद्यार्थ्यांना निकालात पूर्वी ग्रेड दिले जात होते. मात्र, आता मेडिट लिस्ट नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण  कमी होणार आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये असणारी स्पर्धा कमी होईल. परीक्षेचा ताण घेतल्याने होणाऱ्या अनुचित घटना घडणार नाहीत. विद्यार्थ्यांसाठी ही निश्चितच चांगली बाब आहे. 
- संजय कुमार पाटील, केंद्रीय विद्यालय क्रमांक - २, लोहगाव 
---------------------------------