CAT परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध !
CAT परीक्षा रविवार, 24 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली जाईल. ही परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 8:30 ते 10:30, दुसरी शिफ्ट दुपारी 12:30 ते 2:30 आणि तिसरी शिफ्ट 4:30 ते 6:30 पर्यंत असेल. परीक्षेचा निकाल जानेवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सामायिक प्रवेश परीक्षा (Common Admission Test) CAT परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध (Exam admit card released) करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाताद्वारे (Indian Institute of Management Kolkata) https://iimcat.ac.in/ या अधिकृत वेबसाइटवर सामायिक प्रवेश परीक्षेची हॉल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
CAT परीक्षा रविवार, 24 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली जाईल. ही परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 8:30 ते 10:30, दुसरी शिफ्ट दुपारी 12:30 ते 2:30 आणि तिसरी शिफ्ट 4:30 ते 6:30 पर्यंत असेल. परीक्षेचा निकाल जानेवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
CAT प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्व उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आता, CAT 2024 ऍडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा. यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. CAT प्रवेशपत्र प्रसिद्ध केले जाईल. आता दिलेली सर्व महत्वाची माहिती तपासा. पुढील संदर्भासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि परीक्षेसाठी त्याची प्रिंटआउट घ्या.