यंदाचा JEE Advanced चा अभ्यासक्रम जाहीर
JEE Advanced 2025 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचे प्रश्न असलेले प्रत्येकी दोन पेपर असतात. दोन्ही पेपर अनिवार्य असून याचा कालावधी तीन तासांचा असतो.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
IIT कानपूरने (IIT Kanpur) JEE Advanced 2025 साठी अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. (Syllabus for JEE Advanced 2025 has been released) यासोबतच आयआयटी कानपूरने गेल्या वर्षांपासून अभ्यासक्रमात कोणताही बदल केला नसल्याचेही सूचित केले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला jeeadv.ac.in भेट देऊन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेला अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात.
JEE Advanced 2025 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचे प्रश्न असलेले प्रत्येकी दोन पेपर असतात. दोन्ही पेपर अनिवार्य असून याचा कालावधी तीन तासांचा असतो. हे पेपर उमेदवारांची समज, तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमतेचे मूल्यमापन करतात.
दरम्यान, IIT कानपूरने नुकतेच JEE Advanced परीक्षेसाठी दोन वरून तीन संधी देण्यात आली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उमेदवारांना आता सलग तीन वर्षांत जास्तीत जास्त तीन वेळा JEE Advanced चा प्रयत्न करण्याची परवानगी असेल. पूर्वी, विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षांत दोनपर्यंत संधी देण्यात येत होती.