वर्षाच्या सुरुवातीलाच कोटामध्ये आत्महत्या सत्र; अवघ्या 15 दिवसात 3 आत्महत्या 

रात्री ८ वाजता जेव्हा मेसमन टिफिन देण्यासाठी आला तेव्हा अभिजीतने दार उघडले नाही. यानंतर, दोन-तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही दरवाजा तोडला. त्यावेळी अभिजीत पंख्याला लटकलेला दिसला.

वर्षाच्या सुरुवातीलाच कोटामध्ये आत्महत्या सत्र; अवघ्या 15 दिवसात 3 आत्महत्या 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत असलेल्या कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोटा येथे एका १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. (An 18-year-old student has committed suicide in Kota) विद्यार्थ्याने स्वतःच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोटाच्या विज्ञान नगर भागात राहून हा विद्यार्थी नीटची तयारी करत होता. 15 दिवसात आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. (This is the third suicide case in 15 days)

मीडिया रिपोर्टनुसार, १८ वर्षीय विद्यार्थी ओरिसाचा रहिवासी होता. अभिजीत गिरी एप्रिल २०२४ पासून या वसतिगृहात राहत होता आणि नीटची तयारी करत होता. या घटनेविषयी माहिती देताना मेसमन ने संगितले की,  "१५ जानेवारी रोजी जेव्हा खोलीच्या भाड्याबद्दल चर्चा झाली तेव्हा अभिजीतने आता आपण इथे फक्त एक महिना राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काल १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता जेव्हा मी  टिफिन देण्यासाठी गेलो  तेव्हा अभिजीतने दार उघडले नाही. यानंतर, दोन-तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही दरवाजा तोडला त्यावेळी अभिजीत पंख्याला लटकलेला दिसला."

ही माहिती मिळताच विज्ञाननगर पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयाच्या शवागृहात  ठेवला. नवीन वर्षाच्या अवघ्या दोन आठवड्यात कोचिंग विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या विज्ञान नगर पोलिस स्टेशन संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.