धक्कादायक : ड्रग्समुळे अनेक विद्यार्थ्यांना HIV ची लागण
विद्यार्थ्यांनी एकाच इंजेक्शनचा वापर करून ड्रग्सचे सेवन केल्याने या घटना घडल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
त्रिपुरा राज्यातून (Tripura State) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या राज्यातील एका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एड्सची लागण (AIDS prevalence among school students) झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (टीएसएसईएस) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्रिपुरामध्ये एचआयव्हीमुळे 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. विद्यार्थ्यांनी एकाच इंजेक्शनचा वापर करून ड्रग्सचे सेवन (Drug abuse using a single injection)केल्याने या घटना घडल्या आहेत.
त्रीपूरा स्टेट एडस कंट्रोल सोसायटीचे (TSSES) सहसंचालक सुभ्रजित भट्टाचार्य म्हणाले, "आम्ही आतापर्यंत 828 विद्यार्थ्यांची एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून नोंदणी केली आहे. तर 47 जणांना या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी त्रिपुरा बाहेर गेले आहे. एवढेच नाही तर अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून येते की दररोज एचआयव्हीची जवळपास पाच ते सात नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत.
त्रिपुरा जर्नालिस्ट युनियन, वेब मीडिया फोरम आणि TSACS यांनी आयोजित केलेल्या मीडिया कार्यशाळेत भट्टाचार्य यांनी त्रिपुरातील HIV परिस्थितीचे तपशील सादर केले. त्यांनी सांगितले की, "आतापर्यंत 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठे आढळून आली आहेत. या ठिकाणी विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही राज्यभरातील एकूण 164 आरोग्य सुविधांचा डेटा पाहिला आहे. एआरटी (अँटीरेट्रो व्हायरल थेरपी) केंद्रांमध्ये 8,729 लोकांची नोंदणी केली . एचआयव्ही ग्रस्त लोकांची एकूण संख्या 5,674 असून त्यापैकी 4,570 पुरुष, तर 1,103 महिला आहेत. त्यात एक रुग्ण ट्रान्सजेंडर आहे."
भट्टाचार्जी यांनी संगितले की, "एचआयव्ही प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच इंजेक्शनचा वापर करून ड्रग्सचे सेवन केल्याने या घटना घडल्या आहेत.