त्रिभाषा सूत्र समिती साधणार पुण्यात चर्चासत्रातून संवाद

पुणे विभागातील पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधितांनी येत्या १३ नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता विधानभवन कौन्सिल हॉल येथील झुंबर हॉल या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

त्रिभाषा सूत्र समिती साधणार पुण्यात चर्चासत्रातून संवाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या त्रिभाषा सूत्र समितीतर्फे सर्व सामान्य नांगरिकांसह शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांशी संवाद साधला जाणार आहे. येत्या 13 नोव्हेंबर रोजी विधान भवनातील सभागृहात तयासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी केले आहे.

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून कशाप्रकारे लागू करावयाचे याबाबतचे धोरण निश्चित करण्याकरीता समिती पुणे जिल्हा भेटीसाठी येत्या १३ नोव्हेंबर रोजी येणार आहे. या भेटी दरम्यान समिती सामान्य नागरीक, भाषा तज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय /खाजगी संस्था यांचे अध्यक्ष / सदस्य, राजकीय पक्षांचे नेते / लोकप्रतिनिधी प्राथमिक / माध्यमिक, शिक्षक संघटना यांचे अध्यक्ष / सदस्य, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते इत्यादी बरोबर संवाद साधणार आहेत.

समिती त्रिभाषा धोरणासंदर्भात त्यांची मते / विचार जाणून घेणार आहे. तरी सदर चर्चासत्रासाठी पुणे विभागातील पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधितांनी येत्या १३ नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता विधानभवन कौन्सिल हॉल येथील झुंबर हॉल या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.