खासदार रजनी पाटील यांचे निलंबन

rajani patil ,congress ,maharashtra ,mp

खासदार रजनी पाटील यांचे निलंबन

राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या खासदार आणि सोनिया गांधी यांच्या विश्वासू रजनी पाटील यांना राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी निलंबित केले. सभागृहाच्या कामकाजाचा व्हिडिओ बनवणे रजनी पाटील यांना महागात पडले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रजनी पाटील यांच्या कृतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती धनखड यांनी रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.