स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ३ हजारांहून अधिक पदांसाठी भरती
SBI CBO या पदासाठी सामान्य/OBC/EWS या प्रवर्गासाठी ७५० रुपये अर्ज शुल्क असेल तर SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नसेल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदाच्या (CBO) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Application Process) सुरू केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ मे असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज सादर करू शकतात.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३ हजार ३२३ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी निवड ऑनलाइन चाचणी, स्क्रीनिंग, मुलाखत आणि स्थानिक भाषा प्रवीणता या चाचणीवर आधारित असणार आहे.
SBI CBO २०२५ : पात्रता निकष कोणते?
अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. मेडिसिन, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये पदवी असलेले उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असणार आहे. तसेच अर्जदारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
SBI CBO या पदासाठी सामान्य/OBC/EWS या प्रवर्गासाठी ७५० रुपये अर्ज शुल्क असेल तर SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नसेल. उमेदवारांना अर्ज शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन भरावे लागेल.
अर्ज कसा करावा ?
सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवरील "करिअर" विभागावर क्लिक करा. SBI CBO २०२५ अर्ज लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा. त्यानंतर तुमची शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे - स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
अधिकृत सूचना :