नगर रचना संचालनालयाच्या गट-ब परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर
वेळापत्रकानुसार २५ ते २७ नोव्हेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेबाबतचा अधिकचा तपशील उमेदवारंच्या नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येणार असल्याचे संचालन नगर रचना विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत (Department of Town Planning and Valuation) घेण्यात येणाऱ्या गट-ब परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर (Schedule announced) करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार २५ ते २७ नोव्हेंबर रोजी या परीक्षेचे (Examination on 25th, 26th, 27th November) आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेबाबतचा अधिकचा तपशील उमेदवारंच्या नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येणार असल्याचे संचालन नगर रचना विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीच्या पुढील टप्प्याच्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पदांनुसार २५, २६ व २७ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून पुणे / कोकण / नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक संवर्गातील रिक्त 289 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा ३० जुलै ते ९ सप्टेंबर पर्यंत राबवण्यात आली होती. त्यानंतर आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.