दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
सोमवारी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. ज्यामध्ये डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूल, ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूलसह अनेक शाळांचा समावेश आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दिल्लीतील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. (Bomb threat to schools in Delhi once again) सुमारे 40 शाळांना धमकीचे ईमेल आले आहेत. (40 schools have received threatening emails) . त्यामुळे आज सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळांनी मुलांना परत पाठवले आहे. बॉम्बच्या धमकीनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. त्यात डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूल, ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूलसह अनेक शाळांचा समावेश आहे.
या आधी सुध्दा 29 नोव्हेंबर रोजी रोहिणीतील व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. त्याच्या एक दिवस आधी प्रशांत विहार परिसरातील एका उद्यानाजवळ मिठाईच्या दुकानासमोर भीषण स्फोट झाला. या स्फोटात घटनास्थळी उपस्थित असलेला एक टेम्पो चालक जखमी झाला. महिनाभरापूर्वी याच परिसरात असलेल्या सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ भीषण स्फोट झाला होता. या प्रकरणी अद्याप पोलिसांना आरोपींबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही.
eduvarta@gmail.com