FRA:शुल्कवाढीच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन युवासेनेकडून निषेध

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाकडून नफेखोरी करून विद्यार्थ्यांची लूट करतात, असा आरोप वारंवार होत असतो. मात्र,' एफआरए' च्या सन २०२४ ते सन २०२५ मधील आतापर्यंतच्या सुमारे २०५ बैठकांना गैरहजर राहून उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय,आयुष या सर्व संचालकांनी विद्यार्थ्याप्रती आपण किती बांधिल आहोत, हे दाखवून दिले.

FRA:शुल्कवाढीच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन युवासेनेकडून निषेध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) माध्यमातून विना अनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या (Unsubsidized vocational courses) महाविद्यालयांचे शुल्क निश्चित केले जाते. या शुल्क निश्चितीसाठी एफआरए' च्या सन २०२४ ते सन २०२५ मधील आतापर्यंतच्या सुमारे २०५ बैठका पार पडल्या. या सर्व बैठकीला संचालक मंडळातील (Board of Directors Meetings) सदस्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र, संचालक मंडळाच्या बैठकांना डीटीईचे संचालक यांच्यासह सर्व संचालक सदस्यांनी दांडी मारल्याने युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निषेध व्यक्त केला.याबाबतची पोस्ट त्यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाकडून नफेखोरी करून विद्यार्थ्यांची लूट करतात, असा आरोप वारंवार होत असतो. मात्र,' एफआरए' च्या सन २०२४ ते सन २०२५ मधील आतापर्यंतच्या सुमारे २०५ बैठकांना गैरहजर राहून उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय,आयुष या सर्व संचालकांनी विद्यार्थ्याप्रती आपण किती बांधिल आहोत, हे दाखवून दिले.त्यामुळे हा निषेध नोंदविण्यात आला आहे. 

जलसंपदा, जलसंधारण विभागातील भरती रखडल्याने राज्यातील बेरोजगार तरुण रस्त्यावर

ज्या FRA च्या बैठकांना एकही संचालक हजर नाही, अशा FRA कडून निश्चित केलेल्या ४००० महाविद्यालयांच्या शुल्कवाढीला मंजुरी देणे एका अर्थाने बेकायदेशीर ठरते. सर्व संचालकांनी या बैठकांना गैरहजर राहून शिक्षण संस्थांना मनमानी पद्धतीने शुल्क वसुली करण्यासाठी जणूकाही परवाना दिला आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थी, पालकांच्या खिशातून कोट्यावधी रुपयांची शुल्क वसुली केली जात आहे. परंतु, ही शुल्कवाढ रद्द करून शुल्क निश्चितीच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्या सर्व संचालकांना कारणे दाखवा नोटिसा जारी करत पुढील कारवाई केली पाहिजे. या संचालकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक मोहितकर यांना पुष्प देऊन गैरहजर राहिल्याबद्दल त्यांचा निषेध केला, असे मत कल्पेश यादव यांनी व्यक्त केले आहे.