एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी मुदतवाढ, तर ११ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी

सीईटी सेलने यासाठी २३ जुलैपासून नोंदणी सुरू केली व १ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास मुदत दिली. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नसल्याचे निदर्शनास आले. तसेच सीईटी सेलकडे मुदत वाढीसाठी विनंती अर्ज करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेता ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी मुदतवाढ, तर ११ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एमबीबी, बीडीएस प्रवेशासाठी (MBB, BDS Admission) अद्याप नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाने (सीईटी सेल) एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच या अभ्यासक्रमांच्या (MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BNYS, BPTH, BOTH Courses) प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ (Extension of admission application deadline) दिली आहे. आता विद्यार्थ्यांना यासाठी ४ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर ११ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

FRA बैठकीला दांडी मारणाऱ्या संचालक मंडळाचे युवासेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन निषेध

सीईटी सेलने यासाठी २३ जुलैपासून नोंदणी सुरू केली व १ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास मुदत दिली. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नसल्याचे निदर्शनास आले. तसेच सीईटी सेलकडे मुदत वाढीसाठी विनंती अर्ज करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेता ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता ४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे तर ५ ऑगस्टपर्यंत नोंदणी शुल्क भरणा करता येणार आहे. त्यामुळे या मिळालेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सीईटी सेलद्वारे करण्यात आले आहे.

एमबीबीएस, बीडीएसचे नवीन वेळापत्रक -

नोंदणीची मुदत             -  ४ ऑगस्ट

शुल्क भरण्याची मुदत    -  ५ ऑगस्ट

तात्पुरती गुणवत्ता यादी  -  ६ ऑगस्ट

कॉलेजांचे पर्याय निवड -  ६ ते ९ ऑगस्ट

पहिली गुणवत्ता यादी   - ११ ऑगस्ट

कॉलेजांमध्ये प्रवेश      - १२ ते १७ ऑगस्ट