आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही? काय आहे मुख्य कारण.... 

पालकांना अर्ज भरताना केवळ सरकारी अर्थात  जिल्हा परिषदेच्या, महापालिकेच्या किंवा खासगी अनुदानित शाळाच दिसतात.एकही इंग्रजी माध्यमाची शाळा दिसून येत नाही.

आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही? काय आहे मुख्य कारण.... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी आरटीईच्या माध्यमातून आपल्या मुलाला घराजळील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश (Admission to a reputed English medium school) घेऊन देण्यासाठी प्रयत्न करता येतील, या विचाराने आजही अनेक पालक शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) सुरू करण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आरटीई प्रवेशाचा (RTE Admission)ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाला भेट देत आहेत. मात्र, पालकांना एकही इंग्रजी माध्यमाची शाळा (English medium school)दिसत नाही. त्यावेळी त्याचा मोठा हिरमोड होतो.परिणामी आरटीई प्रवेशाचे 26  हजारांहून अधिक अर्ज भरून झाले असले तरी अजूनही अनेक पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेशासाठी का दिसून येत नाही यांचे उत्तर सापडलेले नाही.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सोमवारी (दि.22) दुपारपर्यंत 26 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 8 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.शिक्षण विभागाने पालकांना 16 एप्रिलपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.यंदा शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात बदल केले आहेत.तसेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवताना काही विशेष नियमावली तयार केली आहे. त्यामुळे पालकांना अर्ज भरताना केवळ सरकारी अर्थात  जिल्हा परिषदेच्या, महापालिकेच्या किंवा खासगी अनुदानित शाळाच दिसतात.एकही इंग्रजी माध्यमाची शाळा दिसून येत नाही.

काही पालक पूर्व प्राथमिक वर्गात आपल्या पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळेल का ? याचा विचार करून शाळांचा शोध घेत असल्याचे दिसून आले.पण सारकाही शाळा या केवळ इयत्ता पहिली पासून आहेत. त्यामुळे एकही शाळा उपलब्ध नाही,असे चित्र पोर्टलावर अर्ज भरताना पालकांच्या समोर उभे राहते.परिणामी प्रवेश इच्छुक हजारो पालकांची निराशा होत आहे.

दरम्यान, काही पालकांनी एज्युवार्ताशी संपर्क साधून याबाबत प्रश्न उपस्थित केले.तसेच त्या मागची करणे विचारली.त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी शाळा का दिसत नाही ? याची कारणे खाली दिली आहेत. 

-------------------------------------

आरटीई कायद्यात राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात बदल केला.त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांममधील आरटीई प्रवेशाचे दरवाजे बंद झाले. 
एप्रिल महिन्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया काशी राबवली जाईल याबाबतची नियमावली प्रसिध्द करण्यात आली.त्यानुसार सुरूवातीला शासकीय,अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांममध्ये आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच जर विद्यार्थ्याच्या घराजवळ एक ते तीन किलोमीटर अंतरावर शासकीय, अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा नसेल तेव्हाच संबंधित विद्यार्थ्याला स्वयंअर्थसहाय्यीत शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाईल,असे निश्चित करण्यात आले. वस्तूस्थिती विचारात घेतली तर विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतो; त्यांच्या जवळच्या परिसरात शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळा असतातच .त्यामुळे अर्ज भरताना पोर्टलवर इंग्रजी माध्यमाच्या शाळा दाखवल्या जात नाहीत.